जितेंद्र आव्हाडांना मंत्रिपदावरुन काढा - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 एप्रिल 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आव्हाड यांना मंंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.

मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अभियंत्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणाने राजकीय रंग घेतला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आव्हाड यांना मंंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.

एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही.
न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे.
सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे.
पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही.

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2020

आव्हाड यांच्या बंगल्यात एका स्थापत्य अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अनंत करमुसे (40, रा.उन्नती वुडस,आनंदनगर,कासार वडवली) असे मारहाण झालेल्या अभियंत्याचे नाव असुन रविवारी मध्यरात्री आव्हाड यांच्या पोलीस शरीररक्षकांसह अन्य काही जणांनी राहत्या घरातुन उचलून आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर नेत आव्हाड यांच्यासमक्ष बेदम मारहाण केली, असे त्यांनी  वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात संचारबंदीसह भा.द.वी.365,324,506 (2) आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आमदार नितेश राणे यांनीही त्यांच्या स्टाईलमध्ये आव्हाड यांना इशारा दिला आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live