पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'या' अभिनेत्रीने दिलं सडेतोड प्रत्युत्तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : दिल्ल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठ व उत्तर प्रदेशातील अलीगढ विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीयेत. अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. पण एका अभिनेत्रीच्या ट्विटमुळे देशभरात खळबळ माजली आहे. तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. 

नवी दिल्ली : दिल्ल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठ व उत्तर प्रदेशातील अलीगढ विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीयेत. अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. पण एका अभिनेत्रीच्या ट्विटमुळे देशभरात खळबळ माजली आहे. तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोंधळादरम्यान शांत राहण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व चुकीची माहिती देणाऱ्यांपासून लांब राहण्याचे आवाहन केले होते. याच ट्विटला रिप्लाय देत अभिनेत्री रेणूका शहाणे हिने आंदोलनाला समर्थन देत मोदींवर आरोप करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमुळे रेणूका शहाणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

ABVPच्या कार्यकर्त्यांनी जामिया इस्लामिया मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना केली मारहाण

रेणूका शहाणे आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, 'मोदी सर, लोकांना तुमच्या ट्विटर अकाऊंटपासून व आयटी सेलपासून लांब राहण्यास सांगा. सगळ्यात जास्त अफवा ते पसरवतात, ज्या शांतता व एकतेच्या विरूद्ध असतात. खरी टुकडे टुकडे गँग ही तुमची आयटी सेल आहे सर, त्यांना सांगा की देशात द्वेष पसरवू नका.' रेणूका शहाणेच्या या झहाल ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. थेट पंतप्रधानांच्या आयटी सेलवर आरोप केल्याने या ट्विटवर चर्चा होत आहे.

जामीयाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीने देशभरात निदर्शनं

रेणूका शहाणे प्रमाणेच अनेक कलाकार या आंदोलनकर्त्यांच्यामागे उभे राहिले आहेत. परिणीती चोप्रा, हुमा कुरेशी, विकी कौशल, राजकुमार राव, सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप या व इतर कलाकारांनी विद्यार्थ्यांना पोलिसांनी असे अमानुषपणे मारणे अयोग्य आहे असे मत व्यक्त केले आहे. तर बॉलिवूडचे तीन खान शाहरूख, आमीर आणि सलमान, बिग बी अमिताभ बच्चन, अनुपम खेर आता कुठे आहेत असाही प्रश्न नेटकरी विचारत आहेत. ट्विटरवर #ShameonBollywood व #BollywoodKeBekaarBuddhe असा ट्रेंड सुरू आहे. 

जामिया हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; दखल देण्यास नकार
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (कॅब) दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठ परिसर आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झालेल्य हिंसाचारप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Renuka Shahane criticizes PM Narendra Modi On Twitter


संबंधित बातम्या

Saam TV Live