प्रजासत्ताक दिन 2019 :: लष्कर, हवाई दल, नौदलाचं सामर्थ्य आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 जानेवारी 2019

प्रजासत्ताक दिन 2019 : नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल, नौदल यांचे सामर्थ्य आणि भारतीय संस्कृतीचे विविध चित्ररथांतून दर्शन हे सर्व राजपथावर आज (शनिवार) पाहायला मिळाले. 

प्रजासत्ताक दिन 2019 : नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल, नौदल यांचे सामर्थ्य आणि भारतीय संस्कृतीचे विविध चित्ररथांतून दर्शन हे सर्व राजपथावर आज (शनिवार) पाहायला मिळाले. 

भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणारे संचलन डोळ्यांत साठवावे तितके कमीच होते. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे, म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. तेव्हापासून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरिल रामाफोसा हे अध्यक्ष म्हणून हजर होते.

महात्मा गांधी ही यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात थिम ठेवण्यात आली होती. शाळकरी मुलांनी राजपथावर नृत्य सादर करत महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर लष्कारातील विविध तुकड्यांनी पथसंचलन केले. विविध राज्यांची चित्ररथ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तर, दुचाकींवर सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींनी वाहवा मिळविली. हवाई दलाच्या एअर शो ने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. अखेर पंतप्रधान मोदींनी राजपथावर उतरत नागरिकांचे अभिनंदन केले. 

'भारत छोडो'वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज 
मुंबईतून 1942 मध्ये सुरू झालेल्या व प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी निवड झालेला "भारत छोडो' चळवळीवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर सादर झाला. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त यावर्षीच्या संचलनातील चित्ररथ गांधीजींभोवतीच केंद्रित होते. या वर्षीच्या संचलनात महाराष्ट्रासह 16 राज्यांचे आणि 6 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 22 चित्ररथ सहभागी झाले होते. 

Web Title: marathi news republic day 2019 parade showcases power of indian forces and culture 


संबंधित बातम्या

Saam TV Live