आरक्षणासाठी ब्राह्मण समाजाचं सर्वेक्षण करा - आनंद दावे  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सध्या धनगर, मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणीही जोर धरु लागली आहे, यातच ब्राह्मण समाजानेही उडी घेतली आहे, मात्र आरक्षणाची थेट मागणी न करता  ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली.

आनंद दवे म्हणाले, की सर्वच ब्राह्मण चांगल्या स्थितीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. खूप उच्च अधिकारी सोडले तर आज सुद्धा महाराष्ट्रातील साधारण 80 ते 90 लाख लोकांपैकी 60 ते 70 लाख समाज हा क्रिमीलेअर खालीच आहे. पौराहित्य करून ब्राम्हण समाजातील काही लोकांना तर वर्षातून केवळ 120 दिवसच काम असते. सरकारी नोकऱ्यांची कमतरता तसेच शिक्षण घेणेही समाजातील काही लोकांना शक्य होत नाही, असे स्पष्टीकरण देत अशा परिस्थितीत गुजरात ब्राह्मण शाखेच्या यज्ञेश दवे यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे सर्वेक्षण व्हावे ही मागणी केली आहे.

या मागणीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दिला असून महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या सुद्धा आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण व्हावे ही मागणी आहे. त्यासाठी लवकरच राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली. मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण झाल्यानंतर थेट आरक्षण नाही मात्र काही विशेष मागण्या आम्ही करु, तसेच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Saam TV Live