कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी? 11 आमदारांचे राजीनामे मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ होत आहेत. काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आज त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांना संधी देण्यात आली. 

दरम्यान, भाजपने गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.  

विधिमंडळातील स्थिती

224 एकूण सदस्य

बहुमतासाठी

113 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज

Web Title: Resignation confirmed of 8 congress MLA and 3 JDS MLA In Karnataka

संबंधित बातम्या

Saam TV Live