कॉंग्रेसमध्ये टीम राहुलचं राजीनामासत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

मुंबई/इंदूर  - कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून राहुल गांधी दूर झाल्यानंतर या पक्षात पुन्हा एकदा राजीनामासत्र सुरू झाले आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. 

मुंबई/इंदूर  - कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून राहुल गांधी दूर झाल्यानंतर या पक्षात पुन्हा एकदा राजीनामासत्र सुरू झाले आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर देवरा यांनीही राजीनामा दिल्याने कॉंग्रेसमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. देवरा यांना राष्ट्रीय पातळीवर पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडाणुकीपूर्वी एक महिना आधी तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांना तडकाफडकी दूर सारून देवरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत मुंबईत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. देवरा यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे देवरा काही काळ विजनवासात गेले होते. मध्य प्रदेशात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या विजयामुळे दमदार नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनाही लोकसभा निवडणुकीत परंपरागत मतदारसंघात पराभूत व्हावे लागले. तसेच, त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या अर्ध्या उत्तर प्रदेशमध्येही पक्ष फार काही करू शकला नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आज सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. 

देशात कॉंग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असतानाच महाराष्ट्रात वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी अघाडीला जोरदार फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची अवस्था सुधारली पाहिजे, ही बाब ध्यानात घेऊन लवकरच प्रदेश आणि मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नेमले जातील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

 

Web Title: Resignation in Congress


संबंधित बातम्या

Saam TV Live