'किस केलं म्हणजे आम्ही लेस्बियन होत नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

मुंबई : अभिनेत्री रेहाना पंडित आणि निया शर्मा या दोघी चर्चेत आल्या आहेत त्या त्यांच्या किसमुळे. दोघींनी एका कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या किसमुळे चर्चांना उधाण आलंय. किस केलं म्हणजे आम्ही लेस्बियन होत नाही. हा किस म्हणजे खरं प्रेम आहे, असे रेहाना आणि नियाने म्हटले आहे.

रेहाना व नियाने घेतलेल्या किसचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. होळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रेहाना आणि नियाने एकमेकींना किस केले. किस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे याआधीही 'जमाई राजा' या मालिकेच्या सेटवर या दोघींनी किस केले होते. रेहानाने तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळीही चर्चेला उधान आले होते.

रेहाना म्हणाली, 'निया ही मला बहिणीसारखी आहे. बॉलिवूडमधील ती माझी खूप चांगली मैत्रिण आहे. त्यामुळे आम्ही दोघींनी एकमेकींवर प्रेम दाखवून दिले आहे. मात्र, आमच्या किसची एवढी चर्चा का होतेय? हे समजत नाही. मुली गालांवर एकमेकींचा मुका घेऊ शकतात मग ओठांवर का नाही? आम्हा दोघांनाही एकमेकींचा स्वभाव, फॅशन सेन्स या गोष्टी आवडतात.'

निया म्हणाली, 'एका लहान गोष्टीला उगाचच वाव दिला जात आहे. या किसकडे इतरांचा पाहण्याचा काय दृष्टीकोन आहे हे आम्ही बदलू शकत नाही, लोक काय म्हणतील यावर आम्ही सांगू शकत नाही. रेहाना ही माझ्या बहिणीसारखी आहे. पाच वर्षांच्या ओळखीनंतर इतकं दृढ नातं तर असतंच ना?. तिच्याशीही माझं तसेच नातं आहे.'

Web Title : marathi news Reyhna Pandit lip to lip kiss with Nia Sharma

संबंधित बातम्या

Saam TV Live