आज पुन्हा सीबीआयकडून रियाची चौकशी, वाचा सविस्तर...

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020
  • रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून पुन्हा चौकशी
  • 8 दिवसांनंतर पुन्हा एकदा रियाची चौकशी
  • रिया चक्रवर्ती सीबीआय चौकशीसाठी दाखल
  • डीआरडीओ गेस्ट हाऊसवर रियाची चौकशी
  • आज पुन्हा रियाची चौकशी होण्याची शक्यता
  • चौकशीनंतर रियाला अटक होण्याची चर्चा

आज सलग दुसऱ्या दिवशी रियाची सीबीआय चौकशी होणारे.कालही रियाची चौकशी करण्यात आली होती. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआयनं रियाची काल 10 तास चौकशी केली.

सीबीआयचा मुक्काम असलेल्या सांताक्रूझमधील अतिथीगृहात रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या कुटूंबीयांनी रियावर अनेक गंभीर आरोप केलेयत. तब्बल 8 दिवसानंतर रिया चक्रवर्तीची काल पुन्हा चौकशी करण्यात आली. तर सीबीआय ऑफिसमधून निघाल्यानंतर रिया सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांची सुरक्षा द्यावी अशी मागणी रियाने केली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात रियाला घरी सोडण्यात आलं. आज रियाची पुन्हा चौकशी होणार आहे. 

दरम्यान, काल रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची देखील गुरुवारी कसून चौकशी केली. वाकोला येथील एक्सिस बँकेच्या शाखेत  त्यांच्या व कुटूंबीयांच्या नावे असलेल्या लॉकरची झाडाझडती घेण्यात आली.

रात्री नऊ वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. त्यांच्या बँक व्यवहारासंबंधी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेत. रिया, तिचे आईवडील, भाऊ यांच्यासह सहा जणाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबाबत कुटूंबाची व सबंधिताची शेकडो तास चौकशी करण्यात आली आहे. आणि आज पुन्हा सीबीआय चौकशी केली जातेय.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयनं काल रिया चक्रवर्तीची 10 तास चौकशी केली. या चौकशीनंतर रिया चक्रवर्ती  पोलिस ठाण्यात गेली होती. रियाच्या या भेटीवरून भाजप नेते राम कदम यांनी सरकारवर निशाणा साधलाय. सीबीआय चौकशीनंतर रिया पोलिस ठाण्यात का गेली असा सवाल त्यांनी केलाय. राज्य सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा सवाल करणारं ट्विट राम कदम यांनी केलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live