सावधान ! बाथरूमच्या ड्रेनेज पाईपमधून कोरोना संसर्गाचा धोका

साम टीव्ही
शनिवार, 18 एप्रिल 2020

आता तुमच्या बाथरूमच्या पाईपलाईनमधूनही म्हणजेच ड्रेनेज लाईन मधूनही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती हॉंगकॉंगच्या वैज्ञानिकांकडून व्यक्त करण्यात आलीय. यावर वैज्ञानिक अभ्यास करतायेत. 

कोरोना व्हायरसबद्दलच्या नवनवीन गोष्टी वैज्ञानिकांकडून समोर येतायेत. आता तुमच्या बाथरूमच्या पाईपलाईनमधूनही म्हणजेच ड्रेनेज लाईन मधूनही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती हॉंगकॉंगच्या वैज्ञानिकांकडून व्यक्त करण्यात आलीय. यावर वैज्ञानिक अभ्यास करतायेत. 

कोरोनाची लागण नेमकी कशी होते याबद्दल अद्यापही अनेकांच्या मनात शंका आहेत. त्यातच हाँगकाँगमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ड्रेनेजच्या पाईपमुळे कोरोना संसर्गाचा धोका असल्याचा दावा इथल्या वैज्ञानिकांनी केलाय. 
हॉंगकॉंगच्या एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाली. हे दोघंही वेगवेगळ्या मजल्यावर राहत होते. त्यामुळे ही लागण बाथरूमच्या पाईपलाईनमधून झाली की काय? अशी शंका वैज्ञानिकांच्या मनात निर्माण झालीय. हे जर खरंच असेल तर मुंबई सारख्या शहरात अक्षरश: इमारतींचं जाळं विणलं गेलंय. तिथं काय अवस्था होईल याचा विचार न केलेलाच बरा.

वैज्ञानिकांच्या मनातील शंका

हाँगकाँगमधल्या इमारतीतल्या ज्या दोघांना कोरोनाची लागण झाली ते दोघे एकाच इमारतीत राहत होते. मात्र त्यांच्यात 10 मजल्यांचं अंतर होतं. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या दोघांना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे, लिफ्टच्या बटन्सला हात लावल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला असावा. त्यात त्यांच्या घरातले पाण्याचे पाईपही काढण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या घरच्या सांडपाण्याच्या पाईपमुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला का? यावर वैज्ञानिक अभ्यास करू लागले.

एकीकडे ड्रेनेज पाईपलाईन आणि कोरोना याचा काही संबंध आहे का? यावरून संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडे पाईपलाईन खराब असल्यामुळेच या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय. खबरदारीचा उपाय म्हणून हॉंगकॉंगच्या प्रशासनाकडून लोकांना सतत आपल्या सांडपाण्याच्या पाईपलाईन दुरुस्त करण्याचं आवाहन केलं जातंय. हा व्हायरस खरंच  पाईपलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पसरतो का यावर अजूनही वैज्ञानिक अभ्यास करतायेत. मात्र जर असं असेल तर सर्वांसाठीच हा चिंतेचा विषय ठरेल. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live