VIDEO | जंकफूड खाणं बेतू शकतं जीवावर ?

माधव सावरगावे
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

तुम्ही दररोज पिझ्झा,बर्गर, चिप्स खाता का? जंक फूड खात असाल तर वेळीच सावध व्हा. जंक फूड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पण, हा दावा कितपत खरा आहे. याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

तुम्ही दररोज पिझ्झा,बर्गर, चिप्स खाता का? जंक फूड खात असाल तर वेळीच सावध व्हा. जंक फूड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पण, हा दावा कितपत खरा आहे. याची आम्ही सत्यता जाणून घेतली. मग काय सत्य समोर आलं पाहा.

पिझ्झा, बर्गर, मॅगी, न्यूडल्स, चिप्स म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अगदी कितीही पोट भरलेलं असेल तरीही जंक फूडला कुणी नाही म्हणत नाही. पण, हेच जंक फूड आपल्या आरोग्यास हानिकारक ठरतंय हे तुम्हाला माहित आहे का?तंबाखूसारखंच जंक फूड खाणं जीवघेणं ठरू शकतं, जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात मीठ आणि फॅट्स असतात. त्यामुळं हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा सेंटर फॉर सायन्स एंड एनवायरमेंटरच्या रिपोर्टमध्ये केलाय.

पॅकेटबंद खाद्यपदार्थ आणि जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात मीठ असतं...त्यामुळं असे पदार्थ खाल्ल्याने आपण आजारी पडू शकतो. याचं प्रमाण वाढत गेलं तर हृदयविकाराचा धोकाही निर्माण होऊ शकतो. असा सीएसईने लॅब रिपोर्ट सादर केलाय. त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती हृदयविकार रोग तज्ज्ञ सांगू शकतात. आमचे प्रतिनिधी त्यांना भेटले आणि खरंच जंकफूड आरोग्यास किती हानिकारक आहेत याबद्दल जाणून घेतलं.

कफूड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका?

जंकफूड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात ते कळलं. पण, असे पॅकेटबंद फूड खाताना काय काळजी घ्यायला हवी तेदेखील जाणून घेतलं.

जंकफूड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका?

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

तळलेल्या पदार्थात ट्रान्सफॅट असतात.ते रक्त वाहिन्यांच्या भिंतींवर चिकटतातरक्त वाहिन्या ब्लॉक होऊन हार्ट अटॅक, ब्लॉकेज आणि पॅरॅलीसिससारखे आजार उद्भवतात. पिझ्झा, बर्गर, चिप्स, फ्राईड चिकन अशा जंकफूडमध्ये ऍसिडचे प्रमाण अधिक असते. मिठाचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यास हानिकारक ठरू शकतं

निरोगी राहायचे असेल तर होम फूड खा !

जंकफूडच्या अतिसेवनामुळं लठ्ठपणा बळावतो, हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. त्यामुळं जंकफूडचं अतिसेवन करू नये. आमच्या पडताळणीत जंकफूड खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका निर्माण होतो हा दावा सत्य ठरला.


संबंधित बातम्या

Saam TV Live