...अन् अभिनेता रितेश देखमुखने जाहीर माफी मागीतली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जुलै 2018

अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीत बसलेला फोटो काढल्याने त्यांच्यावर टिका झाली होती. शिवभक्त यामुळे नाराज झाले होते. पण यावर रितेशने फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. आमच्या चुकीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागत असल्याचेही म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड येथील राजसदरेवरील मेघडंबरीत बसून फोटो सेशन करणाऱ्या पानिपतकार विश्‍वास पाटील, अभिनेता रितेश देशमुख व दिग्दर्शक रवी जाधव यांनी तमाम शिवभक्‍तांचा अवमान केला आहे. त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. दरम्यान सोशल मिडीयावरही या कृतीचा शेलक्‍या शब्दात निषेध केला जात आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी देखील मेघडंबरीत बसून काढलेल्या या फोटोची निंदा केली आहे. 'आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील.' असे त्यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live