...अन् रितेशला आठवले विलासरावांचे भाषण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अवघा महाराष्ट्र सध्या पेटला आहे. मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना घाम सोडला. सध्या आरक्षण जातीच्या आधारावर दिले जाते. ज्यांची जात उच्च आहे पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे असे कुटुंब मात्र मदतीपासून दूर राहतात. त्यामुळे गरज नसलेल्यांचे फोफावते आणि समाजात जातीपातीची दरी निर्माण होते. याच विचारांना मांडताना काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी केलेले भाषण सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रितेश देशमुख यानेही आपल्या वडिलांच्या भाषणाची ही क्लिप इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. 

एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात विलासरावांनी महाराष्ट्राचं व्हिजन स्पष्टं केलं होतं. यावेळी मंचावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर उपस्थित होते. हे भाषण 10 वर्षांपूर्वीचे आहे. ज्यात विलासराव देशमुख म्हणाले होते, 'जेव्हा जातीनिहाय आरक्षण देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आरक्षणाचा संघर्ष भविष्यातही राहणार. म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला तर लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. आज प्रत्येकजण माझी जात काय आणि त्यानुसार मला सवलती कशा मिळतील या शोधात आहे. हा संघर्ष टाळायचा असेल तर आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले गेले पाहिजे. हे केवळ एका राजकीय पक्षाला वाटून चालणार नाही तर सर्व पक्षांमध्ये याविषयावर मतऐक्य निर्माण होणे गरजेचे आहे.

ओबीसी समाजाला सवलत मिळणार असेल तर गोपीनाथ मुंडे यांना ती मिळून काही अर्थ नाही कारण त्यांना गरज नाही. त्यामुळे माझा सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही ओबीसी जरी असलात तरी आर्थिक निकषामध्ये तुम्ही वर आहात, तुम्हाला सवलतीची आवश्यकता नाही. तसेच सगळेच देशमुख तुमच्या आमच्यासारखे नाहीत. अनेक देशमुख रोजगार हमीच्या कामावर आहे. केवळ ते देशमुख आहे, म्हणून त्याच्यावर अन्याय करणार का आपण? हा खरा त्यातला प्रश्न आहे.' 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live