'गेली आमची मुंबई खड्ड्यात...' आरजे मलिष्काचं नवीन गाणे व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई : दर वर्षी पावसाळ्यात मुंबईत रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि इतर समस्या डोके वर काढतात. मागील दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबई झाली; या परिस्थितीशी मिळतेजुळते असलेले आरजे मलिष्का हिचे "गेली आमची मुंबई खड्ड्यात' हे गाणे व्हायरल झाले. 

मलिष्का आणि तिच्या टीमने हे गाणे म्हणत मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले. हे गाणे महापालिकेपर्यंतही पोहोचले. यापूर्वी मलिष्काचे 'मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का' हे गाणे समाजमाध्यमांवर गाजले होते. या पावसाळ्यासाठी महापालिकेने केलेली तयारी दाखवण्यासाठी प्रशासनाने मलिष्काला आमंत्रित केले होते. या वेळी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.

Web Title: RJ Malishka s Geli Mumbai Khaddyat song viral again

संबंधित बातम्या

Saam TV Live