छातीत दुखू लागल्याने लालूप्रसाद यादव एशियन हार्ट रुग्णालयात दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छातीत दुखू लागल्याने तसेच शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने लालूप्रसाद यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लालू यांना पाटणा येथून मुंबईत आणण्यात आले असून त्यांच्यासोबत तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती असल्याची माहिती देण्यात आली. 

दरम्यान, चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालू यादव यांना वैद्यकीय आधारावर सहा आठवड्यांसाठी जामिनावर सोडण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live