अमेरिकेतले रस्ते झालेत पब्लिक टॉयलेट, अमेरिकेतल्या रस्त्यांवर मानवी मलमूत्राचा खच

साम टीव्ही
मंगळवार, 21 एप्रिल 2020

आजघडीला जवळपास 36 हजार लोक रस्त्यावर राहतात..आणि त्यांच्यासाठी फिरती शौचालयं आहेत, केवळ 16..धक्का बसला ना.. उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्यांमुळे अमेरिकेत 2017मध्ये हेपॅटायटिस ए ची मोठी साथ आली होती..

अमेरिका म्हटली की कसं सगळं सुंदर, स्वच्छ, चकचकीत असं डोळ्यांसमोर येतं..अमेरिकेबाबत आपल्याला सांगितली जाणारी माहितीही अशीच असते..मात्र, याच अमेरिकेतले रस्ते मात्र चक्क पब्लिक टॉयलेट झालेत असं सांगितलं तर विश्वास बसेल तुमचा?.नाही ना..मग पाहा हा व्हिडीओ...

रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या भिंतीच्या शेजारी नैसर्गिक विधी करणारे हे लोक...ही दृश्यं पाहून तुम्हाला भारताची आठवण आली असेल..मात्र, ही दृश्य आहेत, जगातील एकमेव महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतली..काय धक्का बसला ना...
अमेरिका म्हटली की सर्व काही चकचकीत दिसतं..पण तसं नाही..अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे..तिथंही रस्त्यावर राहणारे लोक आहेत..आणि तिथंही त्यांच्याकडे दुर्लक्षच होतं..आपण आधी जी दृश्यं पाहिली ती अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस शहरातली..तिथं आजघडीला जवळपास 36 हजार लोक रस्त्यावर राहतात..आणि त्यांच्यासाठी फिरती शौचालयं आहेत, केवळ 16..धक्का बसला ना..
उघड्यावर नैसर्गिक विधी करणाऱ्यांमुळे अमेरिकेत 2017मध्ये हेपॅटायटिस ए ची मोठी साथ आली होती..
आता तुम्ही म्हणाल की ही बातमी आज द्यायचं प्रयोजन काय..तर आज अमेरिका कोरोनासमोर हतबल झालीय.दिवसाला किमान हजारभर लोकांचा बळी हा आजार घेतोय..आणि हा आजार पसरण्याच्या कारणांत एक आहे, मानवी विष्ठा..मानवी विष्ठेतूनही हा आजार पसरू शकतो, असं तज्ज्ञ म्हणतात..
आता आपण येऊ भारताकडे..भारतातही आता कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केलीय...भारतात उघड्यावर नैसर्गिक विधी उरकणाऱ्यांची संख्या मोठी आहे....उघड्यावर शौचविधी करणाऱ्यांमुळे समजा हा आजार पसरू लागला, तर काय हाहाकार माजेल, याची कल्पनाच करवत नाही.. .त्यामुळे भारतीयांनी थोडं सांभाळूनच राहायला हवं.


संबंधित बातम्या

Saam TV Live