अजित काकांसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

मुंबई : कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकांना म्हणजे अजित पवारांना भावनिक आवाहन केले असून पवार साहेबांचे निर्णय मान्य करू स्वगृही परत यावेत, अशी भावनिक पोस्ट रोहित यांनी शेअर केली आहे. पवार साहेब हे कुटुंब आणि राजकारण कधीच एकत्र करत नाहीत आणि करणार देखील नाहीत, असा सूचक संकेतही त्यांनी दिला.

या पोस्टमध्ये रोहित म्हणातात की लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्रदादांना धीर देणारे साहेब देखील मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे साहेबच होते. 

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमिका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत, अशा वेळी कुटुबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं, असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title - Rohit Pawar's Emotional post for ajit pawar...

संबंधित बातम्या

Saam TV Live