लोकल प्रवास करताना दरवाजा अडवणाऱ्यांची आता खैर नाही... डायरेक्ट जेलमध्ये होईल रवानगी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

लोकलमध्ये दरवाजा अडवणाऱ्यांची आता खैर नाही. लोकलचा दरवाजा अडवण्याची मोठी किंमत आता प्रवाशांना मोजावी लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते विवार प्रवासादरम्यान मुजोर प्रवाशांकडून लोकलचे दरवाजे ब्लॉक केले जातात.

काही प्रसंगात तर प्रवाशांना लोकलखाली ढकलण्यातही आलं होतं. आरपीएफनं आता या मुजोर प्रवाशांविरोधात मोहीम सुरू केलीय. साध्या वेशातले आरपीएफ जवान या मुजोर प्रवाशांची धरपकड करतायत.

सामान्य प्रवाशांना दरवाजातल्या या मुजोर प्रवाशांची दादागिरी नेहमीच सहन करावी लागते. आरपीएफच्या या कारवाईमुळं लोकलच्या दरवाजातल्या अडवणूक करणाऱ्यांना जरब बसेल अशी आशा आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live