संघाचा भाजपला धक्कदायक फीडबॅक; 2019मध्ये भाजपचे 60 ते 70 खासदार पुन्हा जिंकणार नाहीत  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 जून 2018

संघनेत्यांबरोबर नुकतीच झालेली चर्चा, 2019 च्या रणधुमाळीच्या तयारीच्या गर्जना करणाऱ्या भाजप नेतृत्त्वाला खाडकन जाग आणणारी ठरावी अशी आहे. भाजपचे अनेक मंत्री, खासदार पुन्हा निवडून येवूच शकत नाहीत, अशी सद्यस्थिती आहे. त्यांच्या विरुद्धचा जनतेतील राग इतका तीव्र आहे की भाजपला तिकीटवाटपात किमान 60 ते 70 तिकिटांची तिकिटे कापल्याशिवाय काहीच पर्याय नाही. असा संघाचा फीडबॅक असल्याचे भाजप नेतृत्वाच्या कानावर घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

संघनेत्यांबरोबर नुकतीच झालेली चर्चा, 2019 च्या रणधुमाळीच्या तयारीच्या गर्जना करणाऱ्या भाजप नेतृत्त्वाला खाडकन जाग आणणारी ठरावी अशी आहे. भाजपचे अनेक मंत्री, खासदार पुन्हा निवडून येवूच शकत नाहीत, अशी सद्यस्थिती आहे. त्यांच्या विरुद्धचा जनतेतील राग इतका तीव्र आहे की भाजपला तिकीटवाटपात किमान 60 ते 70 तिकिटांची तिकिटे कापल्याशिवाय काहीच पर्याय नाही. असा संघाचा फीडबॅक असल्याचे भाजप नेतृत्वाच्या कानावर घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्याच्या 270 मधील विशेषत उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात येथील अनेक खासदारांची तिकीटे कापल्याशिवाय पर्याय नसल्याची चर्चा या बैठकीत झाल्याचे चर्चेत कळते. महाराष्ट्रातील सध्याच्या किमान निम्म्या भाजप खासदारांना घरी बसावं चालण्याची स्पष्ट चिन्ह दिसतायेत.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live