जितेंद्र आव्हाडांविरोधात संघाची फिल्डिंग ?

जितेंद्र आव्हाडांविरोधात संघाची फिल्डिंग ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कळवा-मुंब्रा हा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं लक्ष आहे. वास्तविक, युतीच्या जागावाटपात कळवा-मुंब्रा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. असं असलं तरी या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. 

जितेंद्र आव्हाडांचा पराभव करण्यासाठी संघानी आपली सगळी यंत्रणा कामाला लावलीय. संघाचे तब्बल एक हजार स्वयंसेवक या भागात सक्रीय झालेयत. विशेष म्हणजे, कळव्यातल्या ब्राह्मण सभेच्या सभागृहात त्यासाठी नुकतीच एक बैठकही झाल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद किणी यांच्या घरी संघाच्या आणि भाजपच्या नेत्यांनी नुकतंच चहापानही केल्याची चर्चा आहे. मुकुंद किणी यांचा मुलगा मंदार किणी यांना शिवसेनेत दाखल करून घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत. किणी यांनी मात्र या शक्यता फेटाळल्या आहेत. 

संघ आणि भाजपनं चालवलेल्या प्रयत्नांचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. 

२०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मतं मिळाली होती. तर, शिवसेनेला ३८ हजार ८५०, भाजपला १२ हजार तर एमआयएमला १६ हजार मतं मिळाली होती. तिन्ही प्रमुख विरोधकांपेक्षा आव्हाडांची मतं जास्त होती. त्यामुळे सरळ लढतीत आव्हाड यांचा पराभव करणं अवघड असल्याची जाणीव शिवसेना आणि भाजपलाही आहे. त्यामुळे मुंब्र्यातून एमआयएम आणि वंचित आघाडीच्या मुस्लिम उमेदवाराला बळ देण्याची रणनीतीही शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी आखलीय. मुस्लिम मतांचं विभाजन आणि भाजपच्या परंपरागत व्होटबँकेची पुन्हा बांधणी करून आव्हाडांना पराभूत करण्याचा संघाचा इरादा आहे. त्याला आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस कसं सामोरे जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारंय.  

WebTitle : marathi news rss focuses on Kalwa mumbra constituency to defeat jitendra awhad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com