मोहन भागवत पुण्यातील स्वयंसेवकांना काय दिला 'कानमंत्र' ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (गुरुवार) सकाळी कोथरुडमधील शाखेत हजेरी लावत स्वयंसेवकांना 'कानमंत्र' दिला. भागवत सध्या पुण्याच्या खासगी दौर्‍यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी स्वयंसेवकांना कानमंत्र दिल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोथरुडमधील मयूर कॉलनीत भरणार्‍या संघाच्या शाखेत भागवत यांनी सकाळी सात वाजता हजेरी लावली. भागवत उपस्थित राहणार असल्याचा निरोप स्थानिक स्वयंसेवकांना कालच पाठविण्यात आला होता. 

कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरुडमधून बापट यांना जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी यासाठी संघ प्रयत्नशील आहे. 'यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदानासाठी संघ प्रयत्न करेल', असे विधान भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. पुण्यातील स्वयंसेवकांना भागवत यांनी काय कानमंत्र दिला, याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. 

यासंदर्भात स्थानिक संघ स्वयंसेवकांशी चर्चा केली असता, 'भागवत वैयक्तिक कारणामुळे पुण्यात आले आहेत. शाखेचा नित्यनेम चुकू नये, यासाठी त्यांनी उपस्थिती लावली', असे सांगण्यात आले.

WebTitle : marathi news RSS sarsanghachalak mohan bhagwat at pune 

संबंधित बातम्या

Saam TV Live