समलैंगिकता हा गुन्हा नाही पण... संघाने मांडली आपली भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

समलैंगिकता हा गुन्हा नाही पण यामधील लैंगिक संबंध हे निसर्गाच्या विरोधात आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज (गुरुवार) म्हटले आहे.

संघाचे अरुण कुमार म्हणाले, 'समलैंगिकता हा गुन्हा आहे, यावर संघ विश्वास ठेवत नाही. परंतु, विवाह हा दोन भिन्न व्यक्तींमध्ये होत असतो. समलैंगिक व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध हे निसर्गाच्या विरोधात आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेगळी परंपरा आहे. समलैंगिता या विषयावर मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी.'

समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय 17 ऑगस्टला राखून ठेवला होता, यानुसार आज या निर्णयाची सुनावणी झाली. दोन सज्ञानांनी परस्पर संमंतीने ठेवलेले संबंध हा आता अपराध नसून, प्रत्येक व्यक्तीला लैंगिकतेबाबत मूलभूत अधिकार आहेत, तसेच एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) यांनाही समान अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच आता जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे व प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार अशी माहिती न्यायालयाने दिली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live