डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरूच आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 73.70 रुपयांवर पोहचला आहे. काल डॉलरच्या तुलनेत तब्बल 37 पैशांची घसरण झाल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला. शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून 604 पॉईंट्सनं बाजार कोसळलाय..

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरची मागणी वाढत चालल्याने रुपया गर्तेत सापडला. बँका, आयातदार, ऑईल रिफायनर्स यांच्याकडून डॉलरच्या विक्रमी मागणीने रुपयावर प्रतिकुल परिणाम झाला. रुपयामध्ये होत असलेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलांच्या किंमतीध्ये होत असलेली सातत्याने वाढ यामुळे भारतासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

WebTitle : marathi news rupee against dollar share market crashes 

संबंधित बातम्या

Saam TV Live