रशियानं तयार केली कोरोना लस? सर्व चाचण्याही यशस्वी झाल्याचा दावा

साम टीव्ही
मंगळवार, 14 जुलै 2020
  • रशियानं तयार केली कोरोना लस ?
  • सर्व चाचण्याही यशस्वी झाल्याचा दावा
  • कोरोनावर लस शोधणारा रशिया ठरणार जगातील पहिला देश?

कोरोना संकटात एक अतिशय महत्वाची बातमी.... कोरोना व्हॅक्सिनवर रशियानं बाजी मारलीय.  रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठानं कोरोनावरील व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा केलाय. 

कोरोनाच्या संकटात एक अत्यंत दिलासादायक बातमी येतीय. रशियाच्या सेचनोव्ह युनिव्हर्सिटीनं कोरोना रूग्णांवर लसीची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केलाय. हा दावा खरा ठरला तर कोरोनावर लस शोधण्यात रशिया हा जगातील पहिला देश ठरेल. इन्स्टिटूट फॉर ट्रांन्स-लेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे प्रमुख वदिम तरा-सोव यांनी कोरोना लसीची चाचणी यशस्वी झालीय असा दावा केलाय. 18 जूनला या लसीची चाचणी घेण्यात आली. ज्या स्वयंसेवक रूग्णांवर ही चाचणी करण्यात आली ते ठणठणीत झाले आहेत. आता लवकरत हे औषध बाजारात येईल असा दावा रशियानं केलाय. 

 जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या लसीचं परिक्षण सुरू असतानाच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नानं आपल्या लसीचं अखेरचं परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून 30 हजार जणांवर कोरोना व्हायरस लस देण्याची योजना आहे. रशिया आणि अमेरिकेचे प्रयत्न यशस्वी ठरले तर जगासाठी हा सर्वात मोठा दिलासा ठरेल. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live