पंतप्रधान Narendra Modi यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांतील संबंध चांगल्या पद्धतीने प्रस्थापित केल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींना संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) सर्वोच्च नागरी पुरस्कार 'जायद मेडल'ने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना रशियानेही सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे रशियन दूतावासाने ट्विट करुन ही माहिती दिली. यामध्ये म्हटले, की भारत आणि रशियातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि सामरिक सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. 

दरम्यान, रशियाकडून दिला जाणाऱ्या 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल' या सन्मानाला जुना इतिहास आहे. 17 व्या शतकापासून हा पुरस्कार दिला जात आहे. 'पीटर द ग्रेट'ने या पुरस्काराची सुरवात केली.

संबंधित बातम्या

Saam TV Live