VIDEO | सनी लिओनीने केली चोरी ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या चांगलीच चर्चेत आलीय. त्याला कारण ठरलंय हे चित्र.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या चांगलीच चर्चेत आलीय. त्याला कारण ठरलंय हे चित्र.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सनीनं हे चित्र तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं, आणि वादाला तोंड फुटलं. या चित्रामुळे तिच्यावर चोरीचा आरोप होतोय.
सनीनं हे चित्र स्वतः काढल्याचा दावा केला होता. या चित्राच्या विक्रीतून येणारी रक्कम कर्करोगग्रस्त रुग्णांना देण्याची तिनं घोषणा केली होती.
मात्र, हे चित्र प्रत्यक्षात मलिका फाव्रे या फ्रेंच चित्रकार महिलेचं असल्याचा आरोप डाएट सब्या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आलाय.

आम्ही चॅरिटीला पाठिंबा देतो. मात्र, श्रेय न देता एखाद्या कलाकाराची कलाकृती चोरणं आणि आपल्या चॅरिटीसाठी त्याची विक्री करणं वाईट कृत्य आहे. डावीकडे मलिका फाव्रे यांची मूळ कलाकृती आणि उजवीकडे सनी लिओनीची कलाकृती.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सनीनं लगेच त्याला प्रत्युत्तर दिलंय.

मला या कलाकृतीचं एक छायाचित्र दिलं गेलं होतं. तेव्हा मी त्याचं चित्र काढण्याचा निर्णय घेतला. मी कधीही असा दावा केलेला नाही की हे बनवण्यामागे माझा विचार आहे. चित्राच्या लिलावातून येणारी रक्कम  कॅन्सर रुग्णांना मदत म्हणून  दिली जाणार आहे. 

सनी लिओनीच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद तूर्त तरी शमल्याचं दिसत आहे. मात्र, कोणत्याही कलाकाराची कलाकृती रेखाटताना, किंवा त्यावर संस्कार करताना, त्या कलाकाराला श्रेय द्यायला हवं, हा धडा मात्र, सनी इथं शिकली असेल, असं आपण म्हणू शकतो..
ब्युरो  रिपोर्ट, सामटीव्ही


संबंधित बातम्या

Saam TV Live