VIDEO | 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडवणार इतिहास ? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत. सत्तेच्या याच सारीपाटात राष्ट्रवादी काँग्रेस एक विक्रम रचू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात महाशिवआघाडी उदयास आली तर पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, त्यानंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो. शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये अवघ्या एका जागेचा फरक असल्यामुळेच सत्तास्थापनेत राष्ट्रवादीही मुख्यमंत्रीपदावर समान कालावधीसाठी दावा करु शकते.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत. सत्तेच्या याच सारीपाटात राष्ट्रवादी काँग्रेस एक विक्रम रचू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात महाशिवआघाडी उदयास आली तर पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, त्यानंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो. शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये अवघ्या एका जागेचा फरक असल्यामुळेच सत्तास्थापनेत राष्ट्रवादीही मुख्यमंत्रीपदावर समान कालावधीसाठी दावा करु शकते. शरद पवारांच्या या गेममुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. 

१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून राज्यात १५ वर्ष काँग्रेसच्या साथीनं राष्ट्रवादी सत्तेत आहे. एकेकाळी काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं होतं. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ८० वर्षांच्या शरद पवारांच्या झंझावातामुळे भाजपला एकहाती सत्ता मिळवणं शक्य झाली नाही. एक एक साथीदार पक्ष सोडून जात असताना संघर्षाची लढाई शरद पवारांनी जिद्दीनं लढून राज्यात एक करिष्मा घडविला. त्यातच सत्तेत सहभागी होण्याची संधी राष्ट्रवादीला चालून आलीय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला मुख्यमंत्री होणार का हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live