दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीचे कर्नाटक कनेक्शन; आरोपीचा सनातन संस्थेशी संबंध

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याने महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्र प्रशिक्षण घेतल्याने आता त्याचे कर्नाटक कनेक्शन तपासाला आणखी दिशा देणारे ठरत आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अंदुरेचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंदुरे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात  आज (ता.19) हजर करण्यात आले होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याने महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्र प्रशिक्षण घेतल्याने आता त्याचे कर्नाटक कनेक्शन तपासाला आणखी दिशा देणारे ठरत आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अंदुरेचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंदुरे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात  आज (ता.19) हजर करण्यात आले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए एस मुजुमदार यांनी आरोपी अंधुरेला 7 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

महत्वाचं म्हणजे सीबीआयच्या वकिलांनी पोलिस कोठडीसाठी मागणी करताना न्यायालयाला सांगितले. "अंदुरे याने महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये विविध भागात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. जिथे प्रशिक्षण घेतले त्या ठिकाणी सचिनला नेऊन त्याबाबत तपास करायचा आहे. हे प्रशिक्षण कोण आयोजित करत होतं, इतर कुणाचा यात सहभाग आहे, हे तपासण्याचं काम सुरु आहे. तसेच कटातील मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंह तावडे याच्यासोबत अंदुरे याचं संभाषण आणि संपर्क झालेला आहे, असे तपास आधिकाऱ्यांनी सांगितले. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी ही सीबीआयची नवी थीअरी असून आधीच्या तपासात त्यांनी सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावं घेतली होती, असा युक्तिवाद केला.

सीबीआयचे विशेष वकील अॅड विजयकुमार ढाकणे व आरोपीचे वकील अॅड. प्रकाश सालसिंगीकर यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस (सीबीआय) कोठडी सुनावली.


संबंधित बातम्या

Saam TV Live