सेक्रेड गेम्स 2 'या' महिन्यात होणार प्रदर्शित..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर वेबसिरिज 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागाला भरभरुन यश मिळाल्यानंतर गणेश गायतोंडेंची पुन्हा कधी एंट्री होतेय, याची वाट वेबसिरिजचे वेड असणारे बघत आहेत. गेल्या मे महिन्यात 'सेक्रेड गेम्स 2' प्रदर्शित होणार असल्याचे वेबसिरिजच्या निर्मात्यांकडून सोशल मिडीयावर सांगिण्यात आले होते. पण एक महिना उलटला तरी ही वेबसिरिज काही प्रदर्शित झाली नाही.

आता वेबसिरिजच्या टीमकडून प्रेक्षकांना आणखी थोडी वाट बघावी लागणार असल्याचे कळते आहे. या सिरिजच्या दुसऱ्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या भागात सैफ आणि नवाजुद्दीन सोबतच कल्कि कोचलीन, रणवीर शोरे आणि पंकज त्रिपाठी दिसतील. 

'सेक्रेड गेम्स 2' आता ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल. मिड-डे च्या रिपोर्टनुसार ही वेबसिरिज 28 जूनला प्रदर्शित होणार होती. पण दुसऱ्या एका वेबसिरिजच्या प्रदर्शनामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत 'सेक्रेड गेम्स 2'ची प्रदर्शनाची तारीख लांबविण्यात आली आहे. सैफ अली खान सध्या होम प्रोडक्शनचा चित्रपट 'जवानी जानेमन'ची शूटींग करत आहे तर नवाजुद्दीन 'बोले चूडिया' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 

WebTitle : marathi news sacred games 2 viewers will have to wait for bit longer

संबंधित बातम्या

Saam TV Live