पाणीटंचाईचं भीषण वास्तव; मुंबईला अवघे 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मुंबईहून रामनाथ दवणेसह अमोल कविटकर साम टीव्ही पुणे
बुधवार, 19 जून 2019

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्याचा विचार केल्यास तानसा 12 टक्के, मध्य वैतरणा 13 टक्के, भातसा 0.90 टक्के, विहार 4.89 टक्के, तुलसी 24.83 टक्के आणि मोडक सागरमध्ये 37.60 टक्के पाणीसाठा आहे. 

आधीच भीषण दुष्काळ, त्यातच पाऊस लांबला,.त्यामुळं दुष्काळाची दाहकता आणखीनच वाढलीय. पाऊस लांबल्याचा फटका आता मुंबई, पुण्याला बसणार आहे. मुंबई पुण्यावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६ टक्के पाणीसाठा आहे. यातून फक्त 26 दिवसच मुंबईकरांची तहान भागणार आहे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये  सध्या 88 हजार 743 दशलक्ष  लिटर पाणी आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2018 याच वेळी 1 लाख 44 हजार 736 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता.2017 चा विचार केल्यास पाणीसाठा 2 लाख 70 हजार 828 दशलक्ष लिटर एवढा होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्याचा विचार केल्यास तानसा 12 टक्के, मध्य वैतरणा 13 टक्के, भातसा 0.90 टक्के, विहार 4.89 टक्के, तुलसी 24.83 टक्के आणि मोडक सागरमध्ये 37.60 टक्के पाणीसाठा आहे. 

मुंबईवरच नाही तर पुण्यावरही पाणीटंचाईचं संकट घोंगावतोय. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला. गेल्या वर्षीच्या तुलनेत धऱणांमध्ये 1.18 टक्के पाणीसाठा कमी आहे.  पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये  2.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान तो 3.16 टीएमसी एवढा होता. खडकवासला 25.95 टक्के,पानशेत 14.40 टक्के, वरसगाव 6.00 टक्के तर टेमघर धरणात तर 0 टक्के पाणी उरलाय

मुंबईत नोव्हेंबरपासूनच 10 टक्के पाणीकपात आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पालिका प्रशासनाने पाणी जपून वापरण्यासंदर्भात केलेल्या आवाहानला प्रत्येकाने प्रतिसाद देणं ही काळाजी गरज आहे, तरच पाणीटंचाईवर मात करता येईल. 

WebTitle : marathi news sad reality of water shortage in mumbai and pune 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live