मशागत केली, पेरणी केली. मात्र पिक दुसऱ्यानेच कापले- सदाभाऊ खोत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

''आम्ही ठरवून हातकणंगले लोकसभा मतदार संघात उभी-आडवी पेरणी केली. गेली दोन वर्षे या मतदार संघात मी बहुजनांचा खासदार करण्याचा विचार पेरत होतो. यासाठी मतदार संघात चांगली बांधणी केली होती. मशागत केली, पेरणी केली. मात्र पिक दुसऱ्यानेच कापले. माझी मनापासून लोकसभा निवडणूक लढण्याची ईच्छा होती मात्र ते झाले नाही,'' अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांनी आपली खंत बोलून दाखवली. 

''आम्ही ठरवून हातकणंगले लोकसभा मतदार संघात उभी-आडवी पेरणी केली. गेली दोन वर्षे या मतदार संघात मी बहुजनांचा खासदार करण्याचा विचार पेरत होतो. यासाठी मतदार संघात चांगली बांधणी केली होती. मशागत केली, पेरणी केली. मात्र पिक दुसऱ्यानेच कापले. माझी मनापासून लोकसभा निवडणूक लढण्याची ईच्छा होती मात्र ते झाले नाही,'' अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांनी आपली खंत बोलून दाखवली. 

कोल्हापूर : ''आम्ही ठरवून हातकणंगले लोकसभा मतदार संघात उभी-आडवी पेरणी केली. गेली दोन वर्षे या मतदार संघात मी बहुजनांचा खासदार करण्याचा विचार पेरत होतो. यासाठी मतदार संघात चांगली बांधणी केली होती. मशागत केली, पेरणी केली. मात्र पिक दुसऱ्यानेच कापले. माझी मनापासून लोकसभा निवडणूक लढण्याची ईच्छा होती मात्र ते झाले नाही,'' अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपली खंत बोलून दाखवली. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री खोत यांनी सकाळ कार्यालयास भेट देत आपल्या भावना व्यक्‍त केल्या. ते म्हणाले, ''शेटटी यांनी माझ्या विरोधात मोठी तज्ञांची चौकशी समिती नेमली होती. सर्व युनोतील तज्ञ होते. त्यांनी मला संघटनेतून काढून टाकले. माझी मरेपर्यंत संघटना सोडयाची ईच्छा नव्हती. मात्र या कमिटीने निर्णय घेतला. हा निर्णय मान्य असल्याची शेटटी यांनी मान्यता दिली. या निर्णयाने माझा आत्मसन्मान दुखावला. तेव्हापासून हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवायचे असा मी निर्णय घेतला होता. यासाठी दोन वर्षे खूप तयारी केली. सर्व वातावरण तयार करण्यात यश मिळाले. मात्र धैर्यशील माने हा मोठे भाग्य घेवून आला. असं भाग्य कोणाला मिळत नाही. माने यांनी उमेदवारी घेतली. त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहिलो. ते निवडून आले.'' मात्र मला अजूनही खासदारकीच लढवायचे आहेत, असे सांगत भविष्यात आपण लोकसभा निवडणूकच लढणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले. 

राजू शेटटी ही व्यक्‍ती प्रचंड धोरणी आहे. मात्र त्यांची त्यांच्याच बगलबच्च्यांनी फसवणूक केली, दिशाभूल केली असे सांगत मंत्री खोत यांनी शेटटींच्या पराभवातील अनेक फॅक्‍टर बोलून दाखवले. त्यांच्या विजयाचा गुलाला आम्हीच लावला आणि त्यांच्या पराभवाचा गुलालही आम्हीच लावला. यातूनच सर्वच नेत्यांना एक संदेश आहे, तो म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अंतर दिल्यास काय होते, त्याचा हा परिणाम असल्याचे खोत यांनी बोलून दाखवले. 

सदाभाऊ खोत
 


संबंधित बातम्या

Saam TV Live