आम्ही सगळ्या मडक्यांना सारखाच आकार दिला ,पण सदाभाऊंचं मडकं कच्च निघालं- राजू शेट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

औरंगाबादः एखादा कुंभार जेव्हा माठ, मडकं तयार करण्यासाठी माती घेतो, त्याला आकार देतो आणि भट्टीत टाकतो, तेव्हा त्यातील काही मडकी, माठ कच्ची निघतात, गळकी निघतात. सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत असेच काहीसे झाले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेत काम करतांना आम्ही सगळ्या मडक्‍यांना सारखाच आकार दिला होता, पण सदाभाऊ खोतांचं मडकं कच्चं निघालं, यापुढे मडकी पारखून घेणार असा टोला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. 

मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर राजू शेट्टी यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विषयी आपले मत मांडले. 

राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली तेव्हा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता निवडून , पारखून घेतला होता. पण जस मडकं घडवतांना कुंभार एकच माती, साचा वापरतो आणि तरी एखाद मडकं कच्चं राहत, आणि गळत. तसाच काहीसा प्रकार सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत घडला. त्यांच मडकं कच्चंच राहिलं.

पण भविष्यात असा प्रकार पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या तरूण, युवा नेतृत्वाला यापुढे संघटनेत प्रोत्साहन देण्याचा आपला विचार आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलतांना भाजपची साथ सोडल्याचा आपल्याला अजिबात पश्‍चाताप नसल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. आजघडीला सगळ्यात जास्त बुडवेखोर साखर कारखानदार भाजपमध्ये असल्याचा आरोप करतांनाच आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असून दिलेलं मत दुसऱ्या ठिकाणी जातयं असे सांगत ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live