साध्वी प्रज्ञासिंह भाजपमध्ये; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याविरुद्ध लढणार साध्वी प्रज्ञा?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 एप्रिल 2019

भोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

साध्वी प्रक्षासिंह यांच्यावर 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप आहेत. आज साध्वी प्रज्ञासिंहनी भाजपमध्ये प्रवेश केला असून लोकसभा निवडणुक लढणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सोबतच, जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या भोपाळ कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना साध्वी म्हणाल्या की, माझ्यासाठी निवडणुक अवघड नाही.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजप नेता प्रभात झा आणि रामलालसुद्धा उपस्थित होते.

Web Title: marathi news sadhvi pradnya singh joins BJP might contest election against ex congress CM 

संबंधित बातम्या

Saam TV Live