सफाळयात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 मार्च 2018

सफाळे : परिसरात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गुरूवारी (1) रात्री होळीची पूजा करून महिलांनी उपवास सोडले. होळी अभियान, होळी लहान करा, पोळी दान करा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी यावर्षी परिसरात बरयाच ठिकाणी शुक्रवारी धुळीवंदनाच्या दिवशी घातक रासायनिग रंगांचा वापर तसेच प्लॅस्टीकचे पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे यंदाही सफाळे गावातील होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करताना विविध प्रकारची सोंगे करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने गाणी बोलून एकमेकांवर रंगाची उधळण करण्यात आली.

आज धुळिवंदनाच्या दिवशी सकाळी- सकाळी चिकन, मटण तसेच दारूच्या दुकानात रांगा दिसत होत्या. साधारणत: दहानंतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यारस्त्यांवर मुलांचे छोटे छोटे ग्रुप दिसत होते. हातात पिचकारी अथवा रंगाचे हात असलेल्या मुलांच्या दिशेने जाणे लोकं टाळत होती.

मात्र कुणालाही प्रकारची वाईट घटना घडली नाही. विशेषतः दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी व पालक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live