सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्लॅस्टीकचा वापर टाळण्यासाठी प्रय़त्न

विनिता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.
सोमवार, 7 मे 2018

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील गावात प्लॅस्टीकचा वापर टाळण्यासाठी वन्यजीव विभागातर्फे प्रय़त्न सुरू आहेत. व्याघ्र प्रकल्प प्लॅस्टीकमुक्त करण्याच्यादृष्टीने ती सकारात्मक पावले आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प लवकरच प्लॅस्टीक मुक्त होण्यास मदत होणार आहे.

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील गावात प्लॅस्टीकचा वापर टाळण्यासाठी वन्यजीव विभागातर्फे प्रय़त्न सुरू आहेत. व्याघ्र प्रकल्प प्लॅस्टीकमुक्त करण्याच्यादृष्टीने ती सकारात्मक पावले आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प लवकरच प्लॅस्टीक मुक्त होण्यास मदत होणार आहे.

बफर झोनमधील गावांतील लोकांना वेगवेगळे प्रशिक्षण देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे पर्यायी मार्ग निर्माण करण्याचे प्रय़त्न शासनाकडून होत आहेत. बफऱ झोनमधील गावांत वृक्षतोडीला बऱ्यापैकी आळा बसला आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचे पाऊल प्लॅस्टीकमुक्तीच्या दिशेनेच पडते आहे. चार जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात साकारलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अत्यंत घनदाट आहे. त्यातील काही भाग अगदी सहज फिरण्याजोगा आहे. अन्यथा उर्वरीत भागात गाईडशिवाय तुम्ही फिरू शकत नाही. रस्ता भटकणे, श्वापदांचा धोका अशा अनेक गोष्टी येथे धोक्याच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेवून येथे शासनाने पर्य़टन विकास आऱाखडा तयार केला आहे. त्या आराखड्यात बफऱ झोनमधील गावांना अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे.

पर्यटक आल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था बफऱ झोनमधील गावांतील लोकांनी करायची, त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्याच लोकांनी अगदी रानातील जेवणाचा फील येईल, असा पद्धतीने करायची, जे लोक फिरणार आहेत. रस्ता दाखवण्यासह त्यांना माहिती देणारे गाईडही स्थानिक लोकच असतील, असा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार अनेक लोकांना वन्यजीव विभागाने गाईडचे प्रशिक्षण देवून प्रशिक्षीत केले आहे. या सगळ्य़ा गोष्टी विस्तारत असताना प्लॅस्टीकमुक्तीचाही ध्यास वन्यजीव विभागाने हाती घेतला आहे. सह्याद्री व्याघ्रच्या उपसंचालक विनिता व्यास यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्य़ांनी बफर झोनमधील गावांना प्लॅस्टीकचा धोका सांगून त्याबाबत कार्यशाळा घेतल्या आहेत. त्याला पर्यायी मार्ग म्हणून कागदी व कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण दिले आहे.

बफऱ झोनमधील सोळा गावातील चारशेवर महिला व शंभरवर पुरूषांनी ते प्रशिक्षण पूर्ण करून प्रथ्यक्ष त्या पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. प्लॅस्टीकमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वन्यजीव विभागाने बामणोलीत त्याचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. यापुढच्या काळातही व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना प्लॅस्टीकची कोणतेही वस्तू व्याघ्र प्रकल्पात घेवून जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. तो अंतीम टप्प्य़ात आहे. बफर झोनमधील लोकांनाही प्लॅस्टीक न वापरण्याबाबतची जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे प्लॅस्टीकमुक्तीच्या दिशेने व्याघ्र प्रकल्पाचे पाऊल पडते आहे. वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. आपल्या भागात दिसणारे प्लॅस्टीक नष्ट करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्लॅस्टीमुक्तीच्या दिशेने व्याघ्र प्रकल्प वाटचाल करत आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांत बाहेरील पर्यटकांकडून प्लॅस्टीक आत येवू नये, यासाठी आम्ही विशेष खबरदारी घेत आहोतच. त्याशिवाय बफऱ झोनमधील गावांतील लोकांनाही प्लॅस्टीकच्या धोक्याबाबात माहिती देवून त्यांच्यात जागृतीचे काम हाती घेत आहोत. लोकांचा सहभाग व स्वंयस्फूर्तता वाढल्यास व्याघ्र प्रक्लप नक्कीच प्लॅस्टीकमुक्त होईल. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live