आर्ची, परशा आणि नागराज मंजुळे राज ठाकरेंच्या मनसेत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे व चित्रपटातील कलाकार परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे व चित्रपटातील कलाकार परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांनी चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू होती. आणि आता त्यांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अनेक लोकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मनसेची चित्रपट सेना काम करत असल्याचे बघून या तिघांनी या संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू व आकाश ठोसर या सैराटमुळे देशभर प्रसिद्ध झालेल्या कलाकारांनी मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या प्रवेशाचे राजकीय अर्थ काढू नका असे आवाहन मनसेच्या चित्रपट सेनेने केले आहे. आमचे काम बघून त्यांनी संघटनेत प्रवेश केला आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, अनेक पक्षांच्या संघटना असूनही त्यामध्ये या तिघांनी का प्रवेश नाही केला यावर बोलताना त का नाही गेले असा सवाल विचारण्यात येत आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live