पुढे या, संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करा..

पुढे या, संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करा..

कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत. मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे. 

यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा.

 

 

सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे.
पत्ता : ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११ ००२

आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा.

पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संपर्क - 98810999081
मिस्ड कॅाल द्या -  98810999081
फोन - 9881598815
email - Support@sakalrelieffund.com

 

WebTitle : marathi news sakal media group donated 1 cr for kolhapur sangali flood

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com