'सकाळ'चं 88 व्या वर्षांत पदार्पण !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - पुण्यातल्या प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या आठ दशकांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण झालेला आपला "सकाळ' मंगळवारी (ता. 1) 88 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने बुधवार पेठेतील "सकाळ'च्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आजी-आजोबांपासून ते नातवंडांपर्यंत सर्वांचा सोबती असलेला आणि प्रत्येकाची सकाळ प्रसन्न करणारा "सकाळ' आता आपल्याला "ऑनलाइन'देखील नियमित भेटतो. फक्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांपुरतेच मर्यादित न राहता त्या पुढे जाऊन "सकाळ'ने नव्या पिढीशी सहजतेने नवीन नातं जोडले. "ई- सकाळ' या संकेतस्थळाच्या माध्यमातून डिजिटल जगतामध्ये 2000 मध्ये प्रवेश करणारा "सकाळ' आता प्रत्येक मराठी हातातील "स्मार्ट फोन'वर क्षणाक्षणाच्या "ताज्या बातम्या' कळवतो. वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना व्हिडिओची "लिंक' देऊन आपल्या बातम्या अधिक संवादी करण्याचा प्रयत्न "सकाळ' करत आहे. सातत्याने नवे प्रयोग करणारा "सकाळ' आणि वाचक हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आणि नववर्षाबरोबरच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी "सकाळ' कार्यालयात स्नेहमेळावा रंगतो. आपल्या प्रत्येकाच्या उपस्थितीने यामध्ये आणखी रंगत येईल, असा विश्‍वास आहे. या स्नेहमेळाव्यास आपणा प्रत्येकाला उपस्थित राहण्याचे आवाहन "सकाळ' परिवारातर्फे करण्यात आले आहे. कृपया येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live