SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात भाजपाला 5 आणि कॉंग्रेसला 2 जागा

SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात भाजपाला 5 आणि कॉंग्रेसला 2 जागा

एक्झिट पोल 2019 : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' 5 जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' 2 जागांवर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागांसाठी मतदान झाले. या विभागात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचपार्श्वभूमीवर आता या निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये भाजपचा 5 जागांवर विजय होईल तर काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजप, काँग्रेससह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मात्र, आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. 

Web Title: Sakal Saam Exit Poll results BJP to win North Maharashtra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com