#SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 02 जगा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. 

महाराष्ट्राचा अचूक अंदाज सकाळ आणि साम वाहिनी देत असून मुंबईत एकूण 06 जागा असून यापैकी भाजपला 02, शिवसेनेला 02 आणि राष्ट्रवादीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादीला मात्र मुंबईत एकाही जागेवर यश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत युती 06 पैकी 04 जागा कायम ठेवण्यात यश मिळवेल तर आघाडी 02 जागांवर यशस्वी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजप 03 तर शिवसेना 03 जागांवर यशस्वी झाली होती. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रावादीला एकही जागा जिंकता आली नव्हती 2019 च्या निवडणुकीत मात्र, राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता नाही आली तरी काँग्रेस 02 जागांवर यशस्वी होईल अशी शक्यता सकाळ आणि सामच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून 
सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला 29 आणि आघाडीला 19 जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.

Web Title: marathi news sakal saam exit polls mumbai shivsena and bjp may win 2 seats 

संबंधित बातम्या

Saam TV Live