VIDEO | रुक्मिणी मातेच्या साड्यांचा सेल पाहिलात का?

भारत नागणे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेला भाविकांनी अर्पण केलेल्या साड्यांचा सेल सुरु आहे. या साड्या खरेदी करण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केलीय.

पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेला भाविकांनी अर्पण केलेल्या साड्यांचा सेल सुरु आहे. या साड्या खरेदी करण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केलीय.

पंढरपुरात लागलेला हा साडी सेल महिलांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलाय. रुक्मिणी मातेला भाविकांनी अर्पण केलेल्या साड्यांचा हा सेल आहे. इथं नऊवारी, सहावारी साड्या त्याही अगदी 100 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत किमतींत उपलब्ध आहेत.

रूक्मिणी मातेस नवरात्र आणि सणासुदिच्या दिवशी भाविक साड्या अर्पण करतात. मंदिर समितीकडे वर्षभरात 14 हजारांच्या आसपास साड्या जमा होतात. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून प्रसाद म्हणून साड्यांची मागणी केली जाते. ही मागणी  विचारात घेऊन मंदिर समितीनं साड्यांचा हा सेल सुरु केलाय.

अल्प किमंतीत रुक्मिणीची साडी प्रसाद रुपात खरेदी करण्यासाठी महिला भविकांनी इथं गर्दी केलीय.

Web Title -  sale of rukhmini's sarees in pandharpur


संबंधित बातम्या

Saam TV Live