वाढदिवसालाच सलमान खान बनणार मामा ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

बिईंग ह्युमन, दबंगमिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला लहान मुलं किती आवडतात याची प्रचिती बऱ्याचदा आली आहे. कधी एअरपोर्टला तर एखाद्या कार्यक्रमातही लहान मुलगा किंवा मुलगी दिसले तर सलमान लगेचच त्यांना जवळ घेता किंवा त्यांच्याशी संवाद साधतो. गर्दीतही एखाद्या लहान मुलाला धक्का लागू नये याची सलमान काळजी घेत असतो.  आणि हाच सलमान जेव्हा बहिण अर्पिताला मुलगा झाला तेव्हा प्रचंड आनंदी झाला. अर्पिताचा मुलगा अहिलसोबत सलमान खान मस्ती करतानाचे बरेच व्हिडीओही पाहायला मिळाले आहेत. 

Sunday - Funday ! Family Time  Nana & Mamu Loving @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

मात्र सलमान खानसाठी आणखी एक गुड न्यूज आली आहे. ही गुड न्यूज म्हणजे सलमान खान पुन्हा एकदा मामा बनणार आहे.  सलमानची बहिण अर्पिता पुन्हा आई बनणार आहे, आणि म्हणूनच सलमानच्या आयुष्यात आणखी एक लहान बाळ येणार असल्यानं सलमान नक्कीच आनंदी असेल.  
अर्पिताला बाळाच्या डिलीव्हरीसाठी सी-सेक्शन सर्जरी करावी लागणार आहे. आणि आता असं बोललं जात आहे की अर्पिता आणि पति आयुष शर्मा सी-सेक्शन डिलिवरीसाठी 27 डिसेंबर ही तारीख निवडली आहे. आता सलमानच्या चाहत्यांसाठी ही तारीख तर फार महत्त्वाची. कारण याच दिवशी असतो सलमान खानचा वाढदिवस. म्हणजे या खास दिवशी सलमानच्या आयुष्यात आणखी एक नवा पाहुणा येणार. 

Ahil n his mamu ...

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

सलमानच्या वाढदिवसाचं निमित्त साधूनच अर्पिता-आयुषने हा निर्णय घेतला असल्यांच आता बोललं जातय. मात्र याविषयी कोणतीच अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सलमान खान हा पुढील महिन्यात 53वा वाढदिवस साजरा करेल. सलमानचा आगामी चित्रपटा दबंग-3देखील डिसेंबर महिन्यातच रिलीज होत आहे, ज्यात सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसेल. 

Web title : Salman Khan Will become Mama on His birthday?

संबंधित बातम्या

Saam TV Live