'सल्लूभाई' दोन दिवसानंतर जेलबाहेर येणार; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सलमान खानला सशर्त जामीन मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला अखेर जामीन मंजूर झालाय. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सलमान खानला जामीन मंजूर झालाय. पंचवीस-पंचवीस हजारांचे दोन बेल बॉंड घेण्यात आलेत. दोन दिवसांच्या जेलवारीनंतर सलमान खान आज संध्याकाळी ७ वाजता जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. सलमान खानला जामीन मिळाल्याचं समजताच, सलमान खानच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला आणि मिठाई वाटून आनंदही साजरा केलाय.  दरम्यान, सलमान खासगी  चाॅपरने मुंबईला येणार असल्याचंही समजतंय. दरम्यान पुढील सोपस्कारांसाठी ७ मे रोजी सलमान खानला कोर्टात हजर राहावं लागणार आहे.      

संबंधित बातम्या

Saam TV Live