एका लघुशंकेमुळे सलमान अडकला; काळवीट शिकार प्रकरणाचा टर्निंग पॉइंट 

एका लघुशंकेमुळे सलमान अडकला; काळवीट शिकार प्रकरणाचा टर्निंग पॉइंट 

काळवीट शिकार प्रकरणात दबंग सलमान खानला अखेर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या हायप्रोफाईल खटल्यात एक साक्ष महत्त्वाची ठरली. ही साक्ष होती पूनमचंद बिष्णोई यांची. काळवीट शिकार झाली त्या रात्री पूनमचंद हे लघुशंकेसाठी घराबाहेर आले आणि त्यांना सलमान काळविटाची शिकार करत असल्याचं लक्षात आलं. त्या रात्री नेमकं काय झालं. त्याचा बिष्णोईंनी केलेला खुलासा महत्त्वाचा ठरला. 
 
" मी लघुशंकेसाठी घराबाहेर गेलो. त्यावेळी मला गोळीबाराचा आवाज आला. मला जीपची हेडलाईट दिसली. त्यानंतर मी शेजारी राहणाऱ्या छोगारामला उठवलं आणि आम्ही जीपच्या मागे गेलो. त्या जीपमध्ये सलमान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे बसली होती. बाकीचे कलाकार सलमानला शिकार करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. सलमाननंही लगेचच बंदुकीनं गोळी झाडत दोन काळविटांची शिकार केली. मी आणि समाजातल्या अन्य मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सलमान आणि बाकी कलाकारांनी घाबरून काळविटांना तिथेच सोडून पळ काढला." 
 
पुनमचंद बिष्णोईंनी जीपचा नंबर लिहून घेतला आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली. फॉरेन्सिक चाचणीत सलमानच्या जीपमधले रक्ताचे नमुने काळवीटाचेच असल्याचं स्पष्ट झालं. हायप्रोफाईल केसमध्ये साक्षीदार साक्ष फिरवतात, असं चित्र नेहमीच दिसून येतं. मात्र या खटल्यात पुनमचंद आणि छोगाराम या दोघांनीही शेवटपर्यंत साक्ष फिरवली नाही. त्यांची साक्षच सलमानच्या शिक्षेसाठी पुरेशी ठरली. काळविटांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आणि या दोन साक्षीदारांची साक्ष ही सलमानसाठी अडचणीची ठरली आणि शेवटी त्याला न्यायालयाने दोषी ठरवलं. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com