शर्टलेसनंतर भाईजानचा हा अंदाज पहिला का ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जून 2019

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खानची जोरदार हवा आहे. सातत्याने तो आपले वर्कआऊट व्हिडिओ आणि फोटोज शेअर करतोय. त्याचे शर्टलेस अंदाज पाहून तर फॅन्स आणखी दिवाने होतायत. खरं तर सलमानचा शर्टलेस अंदाज अनेकदा सिनेमांमधून आपण पाहिलेला आहे. पण जीममध्ये घाम गाळत असलेला सलमान पाहून कित्येकांच्या काळजाचा ठोकाच चुकतोय. 

सुरूवातीला बऱ्यापैकी शरीरयष्टी असलेल्या या भाईजानने नंतर स्वत:कडे लक्ष द्यायला सुरूवात केली आणि बॉडी बिल्डींगकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर सलमानने शर्ट काढून फिरकावणं ही तर त्याची सिग्नेचर साईनच झाली.

काय आहे सलमानच्या फिटनेसचा फंडा ?

  • सिनेमा हिट करायचा असेल तर फिट राहणं गरजेचं आहे हे गणित सलमानने अचूक ओळखलंय.
  • कमावलेलं स्टारडममध्ये सातत्या राखण्यासाठी घामही गाळावा लागतोच की.
  • स्ट्राँग बॉडीबरोबर फ्लेक्सिबल बॉडी असावी याकडे सलमानचा जास्त कल आहे. म्हणून जोरबैठकांसोबत स्ट्रेचिंगवरही त्याचा भर असतो त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होतायत.
  • सलमानला तिखट जेवण खूप आवडायचं.. पण ट्रेनरच्या सांगण्यानुसार आता तो प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थावर जास्त भर देतोय.
  • मासे, अंडी, दूध यांचा तो आपल्या आहारात जास्त समावेश करतो.
  •  

सुल्तान सिनेमासाठी सलमानने आपलं वजन 96 किलोपर्यंत वाढवलं होतं. तर रेस 3 साठी त्याने 20 किलो वजन घटवलं होतं. वजन वाढवणं जेवढं सोप्पं होतं तेवढंच वजन घटवणं कठीण होतं. पण ऐकेल तो सलमान कसला? भारत सिनेमासाठीही त्याने खूप मेहनत घेतली. फिल्मसिटीतच त्याच्यासाठी जीम बांधण्यात आली होती.

तिशी-चाळिशी ओलांडल्यानंतर अनेकांची ढेरी सुटते. पोट सुटल्याची समस्या घेऊन मग सारे वळतात ते जीमकडे. पण सलमानकडे पाहून तो पन्नाशी ओलांडलाय असं म्हणायलाही कोणी धजावत नाही. आता फक्त being strong म्हणत बसू नका. मग कधी फॉलो करताय बजरंगी भाईजानला?

WebTitle: marathi news salman khan stretching video viral on internet 

संबंधित बातम्या

Saam TV Live