धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जानेवारी 2018

"धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल"

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येवरुन सामना संपादकीयमधून सरकारवर तोफ डागण्यात आलीय. जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयत विष प्राशन केलं होतं. या घटनेवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्ध ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केलीय..जे घडलं ते विदारक आहे..याला राज्य करणे म्हणता येत नाही..मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका..धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचं राज्य आहे..धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकेल अशी बोचरी टीका सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आलीय...अधर्माच्या राज्यात धर्मा पाटील यांचं ऐकणारं कुणी नव्हतं..भाषण माफियांना डोलणारी आणि टाळ्या वाजवणारी माणसं हवी आहेत त्यामुळे धर्मा पाटलांचं सत्य कोण ऐकणार असा सवाल करत भाजपवर हल्लाबोल करण्यात आला.


संबंधित बातम्या

Saam TV Live