संभाजी भिडे सरकारचे सासरे आहेत का ? भाई जगतापांचा सवाल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई- भिमा-कोरेगाव घटनेतील संशयीत संभाजी भिडे हे सरकारचे सासरे आहेत काय ? त्यांना अटक का केली जात नाही असा सवाल कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. 

भिमा-कोरेगावच्या घटनेच्या अनुशंगाने मुंबईत मोर्चे दाखल झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर सभागृत चर्चा व्हावी अशी मागणी अंतर्गत विरोधकांनी लावून धरली. संभाजी भिडेला सरकारच पाटीशी घालत असल्याचा आरोपही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. 

भिमा-कोरेगाव घटनेला तीन महिने झाले. तरी देखील अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली आहे. सरकारच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिडे-एकबोटे समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत. आणि भिडेला अटक का होत नाही असे सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केले. 

तर संभाजी भिडे हा संभाजी या नावाचा वापर करून सामाजिक तेढ निर्माण करीत आहे. त्याचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. यापुर्वी एकबोटेच्या बाबतीत बोलताना तो का सरकारचा जावई लागतो का असा मी सवाल विचारला असता त्याचा खरपूस समाचार घेतला गेला होता.

मग आज मी विचारतो हा काय सरकारचा सासरा लागतो का असा सवाल कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला. एफआयरमध्ये नाव असतानाही त्याला अटक का करण्यात आली नाही. महाराष्ट्राला डाग लावण्याचे काम भिडे करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक कधी करणार याचा खुलासा होणे गरजेचे असल्याची मागणीही जगताप यांनी केली. 

तर आरोपींना सरकार पाठीशी घालत आहे. आणि लोकशाहीच्या मार्गने निघणाऱ्या मोर्चांना सरकार परवानी नाकारत आहे हा काय प्रकार आहे. ही कुठली लोकशाही आहे अशी भूमिका आमदार जोगेंद्र कवाडे यांनी मांडली. तर आजचे वातावरण पहाता लोकांच्या भावना भडकल्या गेल्या नाही पाहिजेत अशी सरकारची भूमिका आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी याबद्दल सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करता येणार नसल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यांच्या या निवेदनानंतर या विषयावर पडदा पडून पुढील कामकाजास सुरूवात झाली 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live