संभाजी भिडेंसह नऊ जणांवर गुन्हा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

बेळगाव - शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह नऊ जणांविरोधात पोलिसांत शुक्रवारी (ता. १३) गुन्हा दाखल झाला. येळ्ळूरला यात्रेसाठी व कुस्ती मैदानासाठी परवानगी असताना तेथे म. ए. समितीचा प्रचार करून प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची फिर्याद बेळगाव ग्रामीण पोलिसांत दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मारुती परशराम कुगजी, प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास नंदी, बी. जी. पाटील, मधू पाटील, भोला पाखरे (सर्वजण रा. येळ्ळूर), किरण गावडे (सोमवार पेठ, टिळकवाडी) व दुधाप्पा बागेवाडी (रा. येळ्ळूर) यांचा समावेश आहे. बेळगाव दक्षिण विभागाचे निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी एस. बी. नाईक यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. 
येळ्ळूरला चांगळेश्‍वरी, कलमेश्‍वर यात्रेनिमित्त गुरुवारी कुस्ती मैदान झाले. यावेळी संभाजी भिडेंना आमंत्रित करण्यात आले होते.

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. परंतु, याचे भान न ठेवता भिडेंनी म. ए. समितीच्यावतीने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकारणाशी संबंधित आक्षेपार्ह व माजी आमदाराविरोधात प्रक्षोभक भाषण केले. याची दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना बेळगावात आणून प्रक्षोभक बोलायला लावले म्हणून सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या एफआयआरमधील अखेरचे संशयित दुधाप्पा बागेवाडी यांनी यात्रेसाठी परवानगी घेतलेली असताना तेथे राजकारण सुरू झाले, शिवाय ध्वनीक्षेपकासाठी स्वतंत्र परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live