संभाजी भिडेंना अटक करण्यासाठी सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 मार्च 2018

संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम दिलंय. संभाजी भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत आहेत असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभांजी भिडे यांच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 8 दिवसांचं अल्टीमेटम दिलं आहे. संभाजी भिडेंवर कारवाई झाली नाही तर कुठल्या शेपटीवर पाय द्यायचा, कोणतं प्रकरण कधी काढायचं हे आपल्याचा चांगलं ठावूक असल्याचा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम दिलंय. संभाजी भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत आहेत असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभांजी भिडे यांच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 8 दिवसांचं अल्टीमेटम दिलं आहे. संभाजी भिडेंवर कारवाई झाली नाही तर कुठल्या शेपटीवर पाय द्यायचा, कोणतं प्रकरण कधी काढायचं हे आपल्याचा चांगलं ठावूक असल्याचा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. सरकारने न्यायालय होण्याचा प्रयत्न करू नये, सरकारने आधी संभाजी भिडेंना अटक करावी. ते दोषी आहेत की निर्दोष हे न्यायालय ठरवेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भिडेंना फूस आहे आणि भिडेंची मोदींनी फूस आहे अशी टीकाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. 


संबंधित बातम्या

Saam TV Live