पोलिसांचे पथक सांगलीत; संभाजी भिडे यांची चौकशी होणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

दरम्यान कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी करण्याकरता पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीत दाखल झाले आहे. पोलिसांच पथक शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांची चौकशी करणार असून हिंसाचाराच्या घटनेबाबत माहिती घेणार आहेत. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कोरेगाव-भीमाची घटना घडली त्या दिवशी संभाजी भिडे कुठे होते याची चौकशी पुणे ग्रामीणचे वरिष्ठ तपासाधिकारी करणार आहेत.

दरम्यान कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी करण्याकरता पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीत दाखल झाले आहे. पोलिसांच पथक शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांची चौकशी करणार असून हिंसाचाराच्या घटनेबाबत माहिती घेणार आहेत. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कोरेगाव-भीमाची घटना घडली त्या दिवशी संभाजी भिडे कुठे होते याची चौकशी पुणे ग्रामीणचे वरिष्ठ तपासाधिकारी करणार आहेत. सांगलीत विशेष पोलिस पथक दाखल झाल्याचं कळताच शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची संभाजी भिडे यांच्या आसपास गर्दी वाढल्याने परिसरात तणाव वाढला आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live