'राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा' : मनसे झेंड्याचा वाद पेटणार

सरकारनामा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्री, मुख्य निवडणूक आयुक्तांसह पोलिसांकडे करण्यात आली आहे. 

संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, प्रकाश धिंडले, महादेव मातेरे, टिळक भोस व सुमेध गायकवाड यांनी आपल्या मागणीचे निवेदन स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्याकडे दिले. तसेच संबंधीत निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त यांनाही पाठविण्यात आले आहे. 

राजमुद्रा ही शिवरायांची प्रशासकीय मुद्रा आहे. शिवरायांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधीत्व करणारी राजमुद्रा ही रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षांनी करणे चुकीचे आहे. प्रांत, भाषा, जात-धर्मावर आधारीत राजकारण करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करीत आहोत, असे संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच राज ठाकरे यांनी राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Web Title - Sambhaji brigade criticism on mns flag 

संबंधित बातम्या

Saam TV Live